पोलिसाच्या भूमिकेसाठी स्मिता तांबेने कापले केस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री स्मिता तांबे लवकरच ‘सावट’ या नव्या चित्रपटात एका पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटात ती इन्वेस्टिगेटिव्ह अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे. या भूमिकेसाठी तिला केस कापावे लागले आहेत. याविषयी स्मिता सांगते, आजवर मराठी-हिंदी सिनेमांमधून अनेक अभिनेत्रींनी पोलिसी खाक्याच्या भूमिका साकारल्या. म्हणूनच या चित्रपटातील ‘आदिती देशमुख’ या व्यक्तिरेखेत नावीन्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी आधी या भूमिकेचा अभ्यासही केला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, पोलीस अधिकारी असलेल्या या आदितीची निरीक्षणक्षमता खूप चांगली आहे. ती शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून गुन्हे सोडवणारी ऑफिसर आहे. केस-स्टडी चालू असताना तिची हातावर लिहायची सवय मी माझ्यात विकसित केली.  ‘सावट’ चित्रपटाचे दिग्दर्शन सौरभ सिन्हा यांनी केले आहे. 22 मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होईल.