बहिणीसोबत साजरी करणार दिवाळी, स्नेहा वाघने शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री स्नेहा वाघ ही मराठी व हिंदी मालिकांमधली एक नावाजलेली अभिनेत्री. सध्या स्नेहा स्टार भारत वाहिनीवरील ‘ना उम्र की सीमा हो’ या मालिकेत अंबाची भूमिका करत आहे. दिवाळीच्या शुभमुहुर्तावर स्नेहाने तिच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

”यंदाची दिवाळी माझ्यासाठी खास आहे. माझी बहिण भुसावळहून माझ्याकडे आली आहे. तिच्यासोबत मी हा दिवाळीचा सण साजरा करणार आहे. आम्ही दिवाळीत वडिलांना खूप मिस करतो. दिवाळी कायमच माझ्यासाठी खास असते. लहानपणी तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बनवायचो. शेवटच्या दिवशी ते किल्ले फटाक्याने फोडायचो. खूप गोड होते ते दिवस. आता मोठी झाल्यावर फटाक्यांचं क्रेझ कमी झालं आहे. पण फराळ खाण्याची आवड काही कमी झालेली नाही. बेसनचा लाडू माझा सर्वात आवडता पदार्थ. माझ्या सर्व चाहत्यांना दिवाळीच्या खूपखूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदाची व दिव्य़ांप्रमाणे उजळणारी जावो. तसेच सुरक्षितही जावो’ अशा शब्दात स्नेहाने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.