समोशांवर चक्क सीरियल नंबर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मॉलमध्ये खरेदीला गेल्यावर प्रत्येक वस्तूवर आपल्याला विशिष्ट क्यूआर कोड आणि सीरियल नंबर पाहायला मिळतात. आता हे सवयीचेच झाले आहे. पण खाद्यपदार्थांवर कुणी सीरियल नंबर टाकल्याचे आपण कधी पाहिले नाही. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. त्यात एका मिठाईवाल्याने चक्क समोशांवर सीरियल नंबर टाकल्याचे दिसते आहे. हा फोटो पाहून नेटिझन्स हैराण झाले आहे. सीरियल नंबर का टाकला असावा याबाबत तर्कवितर्क लावत आहे.

नितीन मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर हा फोटो शेअर केला असून तो झपाटय़ाने व्हायरल होतोय. मी समोशांची ऑर्डर दिली होती, मात्र त्यावर सीरियल नंबर पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. कुणी माझ्या मिठाईवाल्याला टेक्नॉलॉजीपासून दूर ठेवू शकेल का, असे मिश्रा यांनी पोस्टमध्ये म्हटलेय. या फोटोवर नेटिझन्सच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. दिलेल्या कोडवरून चटणी ऑनलाइन डाऊनलोड करा, अशी गंमतीदार कमेंट एका युजरने केली आहे, भविष्यात रसगुल्ल्यांवर क्यूआर कोड पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको असे दुसऱया युजरने म्हटले आहे.