गजराज देतोय स्वच्छतेचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर सध्या एका गजराजाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसतेय की, गजराज जमिनीवर पडलेला कचरा आपल्या सोंडेने अलगद उचलून कचराकुंडीत टाकताना दिसत आहे. एकीकडे नागरिक रस्त्यावर इतरत्र कचरा टाकत असताना गजराजाने माणसापेक्षा प्राणी जास्त शिस्तबद्ध असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सचे मन जिंकून घेत आहे.