सोलापुरातील 30 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाच्या विद्यार्थी गणवेश वाटप योजनेची रक्कम खर्ची टाकण्याकरिता राबविण्यात येत असलेली ‘पीएफएमएस’ ही नवीन प्रणाली अनेक मुख्याध्यापकांना अवगत होऊ शकली नाही. या ऑनलाइन किचकट पद्धतीमुळे व दिलेल्या अल्प मुदतीमुळे जिह्यातील 380 शाळांच्या मुख्याध्यापकांना गणवेश खरेदीस विलंब झाला. गणवेश खरेदी न झाल्यामुळे या शाळांना दिलेले अनुदान शासनाकडे परत गेले. यामुळे जिल्ह्यातील तब्बल 30 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.

दरम्यान, गणवेशाचे परत गेलेले अनुदान पुन्हा द्या, अशी मागणी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनांच्या गुरुसेवा परिवाराच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार व उपमुख्यलेखा वित्त अधिकारी उत्तम सुर्वे व शिक्षणाधिकारी संजय जाकीर यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे (डोगे) यांनी दिली.

मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांची महाराष्ट्र बँकेत खाती उघडण्यात आली होती. या खात्यात यंदाच्या शैक्षणिक कर्षासाठी सप्टेंबर महिन्यात गणवेशाच्या रकमेचे लिमिट सेट करून ‘पीएफएमएस’ प्रणालीद्वारे गणवेश खरेदी करण्याचे सूचित करण्यात आले. जिह्यातील अनेक मुख्याध्यापकांनी या प्रणालीद्वारे गणवेश खरेदी करून त्याचे काटपही केले. मात्र, दक्षिण सोलापूर तालुक्यातील 26, उत्तर सोलापूर 22, अक्कलकोट 18, करमाळा 39, माळशिरस 69, मोहोळ 6, पंढरपूर 53, बार्शी 40, माढा 30, मंगळवेढा 32, सांगोला तालुक्यातील 45 अशा जिह्यातील एकूण 380 मुख्याध्यापकांना याकामी किलंब झाला. त्यामुळे या शाळांचे अनुदान शासनाकडे परत गेले क या शाळा गणवेश अनुदानापासून वंचित राहिल्या. परत गेलेली अनुदानाची रक्कम परत मिळेल, असे वाटत असताना अचानक बँक खाती बंद करून एचडीएफसी बँकेत नवीन खाती काढण्याविषयी शासनस्तरावरून सांगण्यात आले आहे. आता अनुदान परत गेलेल्या शाळांतील विद्यार्थी व पालकांकडून गणकेशाची मागणी मुख्याध्यापकांकडे होत आहे. ज्यांनी क्रेडिटवर गणवेश आणले, त्या शाळांकडे कितरक पैशांची मागणी करीत आहेत. याविषयी संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दाद मागितली. मात्र, एचडीएफसी बँकेत खाते उघडल्यानंतर याचा किचार होईल, असे सांगण्यात आले. अद्यापही एचडीएफसी बँकेत अद्यापि खाते उघडले गेले नाहीत. यामुळे मुख्याध्यापकांची हेळसांड होत आहे.

याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व लेखा, वित्त अधिकारी यांनी यात लक्ष घालून मुख्याध्यापकांची होणारी हेळसांड थांबवावी व किमान प्रजासत्ताक दिनापूर्वी मुलांना गणवेश मिळतील, अशी तजवीज करावी, अशी मागणी करण्यात आली. सूर्यकांत हत्तुरे, आदर्श समितीचे नेते बाबा शेख, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष महिबूबसाब सकार, आदर्श समितीचे जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत क्हनमाने, संघाचे नेते सिद्राम कटगेरी यांच्यासह पदाधिकाऱयांनी निवेदन दिले.