शेअर मार्केटमधील नुकसान, 1 कोटी 80 लाखांचे कर्ज; पत्नी, दोन मुलांसह शिक्षकाने जीवन संपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअर मार्केटमध्ये झालेले नुकसान व 1 कोटी 80 लाख रुपयांच्या कर्जामुळे निराशेतून एका शिक्षकाने पत्नी व दोन मुलांना विष पाजून स्वतः आत्महत्या करत कुटुंब संपवले. ही घटना बार्शी तालुक्यात घडली. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे.

योगेश पाटील असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पत्नी माधुरी पाटील व मुले अर्थव, शिवांश अशी विष पाजण्यात आलेल्यांची नावे आहेत. संपूर्ण कुटुंब संपण्याची ही जिह्यातील दुसरी घटना आहे. बार्शी तालुक्यातील वैरागजवळ असलेल्या हत्तीज गावचे योगेश पाटील (49) हे नंदुरबार येथे शिक्षक होते. त्यांनी शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविली होती. काही रक्कम त्यांनी नातेवाईकांकडून कर्ज स्वरूपात घेतली होती. शेअर मार्केटमध्ये झालेले नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे ते तणावात होते. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त ते पत्नी माधुरी आणि अर्थव, शिवांश यांच्यासह आपल्या हात्तीज (वैराग) गावी आले होते. तणावातून त्यांनी घरात पत्नी व दोन मुलांना विष पाजले व त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.