सोलापुरात चार लाखांच्या बनावट सिगारेट जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापुरात कर्नाटकातून आलेल्या सुमारे चार लाख रुपयांच्या सिगारेट जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महमद अझहर, मोहम्मद दारूद शेख, परवेझ इब्राहिम बागवान असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात बनावट सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तपासादरम्यान परवेझ बागवान यांच्या सुपर पान शॉपमध्ये प्रतिबंधित असलेल्या 63 हजार 922 रुपयांच्या बनावट सिगारेट आढळल्या. या सिगारेट जप्त करून अधिक तपास केला असता कर्नाटक राज्यातील कलबुर्गी येथे राहणारा मोहम्मद अझर शेख हा बनावट व प्रतिबंधित सिगारेट विकत असल्याचे आढळले. त्याच्याकडून 4 लाख 18 हजार 712 रुपयांच्या सिगारेट जप्त करून या दोघांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.