चोपडा एसटी बस टँकर अपघातात गाड्यांचे नुकसान, प्रवासी बचावले

489
accident

कोपरगाव तालुक्यात नगर-मनमाड हमरस्त्यावर येसगांव पाटानजीक भरधाव वेगाने जात असलेल्या टँकरने उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागच्या बाजूने जोराची धडक दिली. या अपघातात बसचे व टँकरचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या धडकेत कोणी जखमी झाला नाही. सदर घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे.

या संबंधी माहिती अशी की, चोपडा डेपोची बस क्र एमएच 20 बीएल 3465 ही कोपरगांवच्या दिशेने येसगांव पाट येथे उभी असता टँकर क्र एमएच 43 वाय 2941 ने पाठीमागून बसला जोराची धडक दिली. यात बसच्या मागच्या भागाचे मोठे नुकसान झाले. टँकरच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी बसचालक विश्‍वनाथ काशिनाथ वानखेडे रा.मल्हारपुरा चोपडा जि.जळगांव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालक रविंद्र विक्रम सोनवणे (रा. कुदलगांव ता.चांदवड जि.नाशिक) याचेवर 47/2019 भादवि कलम 279,427 व मो.वा.का.क. 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ए. एम. आंधळे पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या