स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची शनिवारी बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची शनिवार, 21 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता शिवसेना नेते, महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भवन, दुसरा मजला येथे महासंघ पदाधिकारी, संलग्न समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची सभा आयोजित केली आहे. त्याचप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेना भवन, तिसऱया मजल्यावरील आई भवानीच्या आरतीचा मान महासंघाला मिळाला असून सभेनंतर आरती 7 वाजता होणार आहे. यावेळी महासंघाचे कार्याध्यक्ष आमदार विलास पोतनीस, सुनील शिंदे, सरचिटणीस प्रदीप मयेकर तसेच महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सर्वश्री चंद्रकांत वैद्य, वामन भोसले, अजित सुभेदार, राजीव जोशी व इतर महासंघ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संघटन सचिव दिनेश बोभाटे, उमेश नाईक यांनी दिली.