पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर शेअर बाजारात तेजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून देशाला महत्त्वाची सूचना देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे गुतंवणूकदारांनी शेअर विकायला सुरूवात केली. त्यामुळे निर्देशांक घसरला. पंतप्रधानांनी ट्विट केले, त्यावेळी शेअर बाजार 38,432.01 अकांवर होता. या ट्विटनंतर तो सुमारे 101 अंकांनी घसरून 38,331.01 पर्यंत खाली आला. तसेच निफ्टीमध्येही 10 ते 15 अंकांची घसरण झाली. त्यानंतर पंतप्रधान देशाच्या सुरक्षेबाबत माहिती देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर बाजारात तेजीला सुरुवात झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशामध्ये ‘मिशन शक्ती’ यशस्वी झाले असल्याचे सांगितल्यानंतर बाजारात उत्साह संचारला आणि संभ्रम दूर झाल्याने बाजारात तेजी दिसू लागली. थोड्याच वेळात निर्देशांक 38,443.5 अंकावर पोहचला. तर निफ्टीमध्येही तेजी येत निफ्टी 11,548 अंकांवर पोहचला. दुपारी 1.19 मिनिटांपर्यंत निर्देशाकांत 188.30 अंकांची वाढ होऊन तो 38,421.71 वर पोहचला होता. तर निफ्टीमध्ये 48.75 अंकांची वाढ होत तो 11,532 वर पोहचला होता.