दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाला तातडीने मदत देण्याऐवजी शाब्दिक कसरती करणाऱया महायुती सरकारवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज तोफ डागली. ‘शेतकरी भयंकर संकटात आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री पहिला ट्रिगर, दुसरा ट्रिगर करत का बसले आहेत? हा वेळकाढूपणा करण्यापेक्षा शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱयांच्या हातात तत्काळ मदत द्या,’ असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले.
आदित्य ठाकरे यांनी आज परभणी जिह्यातील टाकळी कुंभकर्ण, जालना जिह्यात वरफळ आणि रामनगर साखर कारखाना तसेच छत्रपती संभाजीनगर जिह्यात भगतवाडी येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन दुष्काळाने करपलेल्या पिकांची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱयांनी आपल्या व्यथा-वेदना त्यांच्यापुढे मांडल्या. त्यातून सरकारच्या
कारभाराचे वास्तव समोर आले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सरकारचा समाचार घेतला. ‘गेल्या वर्षी अतिवृष्टीग्रस्तांना जाहीर केलेल्या 32 हजार कोटींच्या पॅकेजमधील एक खडकूही मिळालेला नाही. जलयुक्त शिवारसाठी 12 हजार कोटी रुपये वाटण्यात आले. शेतकऱयाला पीक विमा नाही, याचा हिशेब सरकारने जनतेसमोर ठेवावा,’ अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री दौरे काढतात, पण शेतकऱ्यांना भेटतच नाहीत. त्यांनी शेतकऱयांना भेटायला हवे. बळीराजासोबत चर्चा केली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही शिकायचं कसं? विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा
पाहणीदरम्यान परिसरातील विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. ‘शेतातले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. हातात एक रुपयाही उत्पन्न उरलेले नाही, अशा बिकट परिस्थितीत आम्ही पुढे शिक्षण कसे घ्यायचे? फी कुठून भरायची? अशी व्यथा विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. आदित्य ठाकरे यांनी सर्वांना धीर दिला. ‘शिवसेना सदैव शेतकऱयांसोबत आहे. आमची बांधिलकी तुमच्याप्रति आहे. कुणीही बरंवाईट करण्याचा विचार मनात आणू नका, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
फक्त परीक्षा फी नको, संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा!
परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. ‘परीक्षा शुल्क माफ केले खरे, पण दोन-तीन महिन्यांत परीक्षा आहेत का? शेतकऱयांच्या मुलांची पूर्ण शैक्षणिक फी माफ केली पाहिजे. नेमकी वेळ कसली बघताय,’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
या दौऱयात शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार राहुल पाटील, आमदार कैलास पाटील, उपनेते डॉ. विवेक नावंदर, सुभाष पाटील, संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे आदी उपस्थित होते. कारभाराचे वास्तव समोर आले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सरकारचा समाचार घेतला. ‘गेल्या वर्षी अतिवृष्टीग्रस्तांना जाहीर केलेल्या 32 हजार कोटींच्या पॅकेजमधील एक खडकूही मिळालेला नाही. जलयुक्त शिवारसाठी 12 हजार कोटी रुपये वाटण्यात आले. शेतकऱयाला पीक विमा नाही, याचा हिशेब सरकारने जनतेसमोर ठेवावा,’ अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. या दौऱयात शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार राहुल पाटील, आमदार कैलास पाटील, उपनेते डॉ. विवेक नावंदर, सुभाष पाटील, संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे आदी उपस्थित होते.