
पद्मावत सिनेमामुळे चर्चेत आलेले राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर बुधवारी जयबुर बंद ठेवण्यात आले आहे. गोगामेडी यांच्या समर्थकांनी हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी बंदचा इशाराही दिला आहे. सीसीटिव्ही फुटेजमधून कळते की, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी तीन हल्लेखोरांनी जयपूरमध्ये गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
गोल्डी बरार आणि लॉरेंस बिश्नोई गॅंगशी जोडलेले गॅंगस्टर रोहित गोदाराने फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. या हल्ल्यात गोगामेडी आणि त्यांच्या दोन साथीदाऱ्यांना गोळी लागली. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषीत केले. पोलिसांनी सांगितले की, चकमकी दरम्यान गोगागडी यांच्या सोबत असलेल्याने एका हल्लेखोराला मारले. राजपूत नेत्याच्या हत्येनंतर राजस्थानमध्ये निदर्शने करण्यात आली.
राजपूत नेत्याच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर शिप्रा रोड जाम केला आणि आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. जयपूरसह चूरु, उदयपूर अलवर आणि जोधपूरमध्येही निषेध करण्यात आला.
























































