सुषमा अंधारे यांची आज मुलुंडमध्ये जाहीर सभा, शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा मुंबईत

राज्यभरात मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महाप्रबोधन यात्रा आता मुंबईत दाखल होत आहे. मुलुंड पूर्व येथे उद्या, गुरुवारी सायंकाळी 6 वाजता शिवसेना शाखा क्र. 105 (108), अंबिका प्लाझा बिल्डिंग, 90 फूट रोड, मुलुंड (पूर्व) या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. आपल्या खास शैलीत त्या विरोधकांना ‘सळो की पळो’ करून सोडतील. या सभेला शिवसेना उपनेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती असणार आहे.