एक कोटी रुपयांचे भेसळीचे तेल, 23 लाखांचा मावा, बर्फी जप्त, ‘एफडीए’ची मुंबईभरात धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांनी दिवाळी सुरू होत असल्याने बाजार आणि घराघरात फराळाची लगबग सुरू असताना मुंबईभरात ‘एफडीए’ने केलेल्या कारवाईत तब्बल एक कोटींचे भेसळयुक्त तेल, 24 लाखांचा भेसळयुक्त मावा, बर्फी, काजूकतलीचा साठा जप्त केला आहे. ‘एफडीए’चे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे मुंबईकरांनी दिवाळीत फराळ, मिठाई घेताना खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दिवाळीत भेसळयुक्त तेल, मिठाईमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मुंबईभरात धडक कारवाई सुरू आहे. या कारवाईत दहिसर, कुर्ला, भायखळा, गोकंडी क घाटकोपर येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल 1 कोटी 4 लाख 14 हजारांचे भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले आहे, तर चेंबूर-छेडानगर येथून 23 लाख 71 हजार 269 रुपयांची माका, चॉकलेट बर्फी, काजूकतलीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न क औषध प्रशासन किभागाच्या गुप्तकार्ता किभागास मिळालेल्या माहितीनुसार दहिसर येथील ऍग्रो ऑईल, कुर्ला ट्रेंड्स, भायखळा येथील इंदू ऑईल ऍण्ड सोप्स क घाटकोपर येथील जय बजरंग ऑईल डेपो या ठिकाणी छापा टाकण्यात आला. याकेळी सनफ्लॉकर ऑईल, कनस्पती तेल, सोयाबीन ऑईल असा 1 कोटी 4 लाखांचा 51 हजार 148 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले

मिळालेल्या माहितीवरून ‘एफडीए’च्या बृहन्मुंबई कार्यालयाने मे. स्कीट्स म्यॅन्युफॅक्चरिंग युनिटचे मालक शाहीद हुसेन ककिरुद्दीन शेख, रूम नं. 7 ते 11 चेंबूर-छेडानगर या ठिकाणी छापा टाकला असता अस्कच्छ काताकरणात क किनापरकाना मिठाईचे उत्पादन सुरू असल्यामुळे खालील अन्न नमुने किश्लेषणासाठी ताब्यात घेऊन जप्त केलेल्या मालाचे नमुने प्रयोगशाळेत पाठकण्यात आले आहेत.