
सामना प्रतिनिधी । दुबई
पुरुषांच्या तसेच महिलांच्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपचा बिगूल मंगळवारी दणक्यात वाजला. आयसीसीकडून दोन्ही वर्ल्ड कपच्या वेळापत्रकांची घोषणा करण्यात आली. दोन्ही वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियातच आयोजित करण्यात येणार आहेत. पुरुषांचा वर्ल्ड कप या वर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून महिलांचा वर्ल्ड कप पुढल्या वर्षी 21 फेब्रुवारी ते 8 मार्च यादरम्यान रंगणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया 24 ऑक्टोबरला सलामीलाच दक्षिण आफ्रिकेला भिडणार असून हरमनप्रीतचा हिंदुस्थानी महिला संघ 21 फेब्रुवारीला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये गट साखळीत लढत होणार नाही.
हिंदुस्थानी पुरुष संघांच्या लढती खालीलप्रमाणे
24 ऑक्टोबर – हिंदुस्थान – द.आफ्रिका, पर्थ
29 ऑक्टोबर – हिंदुस्थान – पात्रता फेरीतील संघ, मेलबर्न
1 नोव्हेंबर – हिंदुस्थान – इंग्लंड, मेलबर्न
5 नोव्हेंबर – हिंदुस्थान – पात्रता फेरीतील संघ, ऍडलेड
8 नोव्हेंबर – हिंदुस्थान – अफगाणिस्तान, सिडनी
पुरुष स्पर्धेची गटवारी
अ गट
पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, पात्रता फेरी एक, पात्रता फेरी दोन
ब गट
हिंदुस्थान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, पात्रता फेरी तीन, पात्रता फेरी चार
महिला स्पर्धेची गटवारी
अ गट
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, हिंदुस्थान, श्रीलंका, पात्रता फेरी एक
ब गट
इंग्लंड, वेस्ट इंडीज,
द. आफ्रिका, पाकिस्तान, पात्रता फेरी दोन




























































