
T20 World Cup 2022 ही आयसीसीची सर्वात मोठी स्पर्धा 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सुरुवातीला 8 संघांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 4 संघ सुपर 12 फेरीत प्रवेश करतील. 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 फेरी सुरू होणार असून पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC T20 विश्वचषकाची 6 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. 23 ऑक्टोबरला हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. या सामन्याची अवघ्या 10 मिनिटांत 90 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. नामिबिया श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणार्या पहिल्या सामन्याची फक्त काही तिकिटे शिल्लक आहेत. यानंतर 16 ऑक्टोबरला यूएईचा सामना नेदरलँडशी होणार आहे. हे दोन्ही सामने गिलॉन्गमधील 36,000 क्षमतेच्या कार्डिनिया पार्क स्टेडियमवर खेळवले जातील.
याबद्दल ICC T20 विश्वचषक प्रमुख मिचेल एनराईट म्हणाले की, “आम्हाला आनंद होत आहे की, या रविवारी गिलॉन्ग येथे होणारा उद्घाटन सामना आणि आठवड्यानंतर सुपर 12 सामने पाहण्यासाठी आमच्याकडे प्रेक्षक येणार आहेत. बर्याच सामन्यांसाठी तिकिटे अजूनही उपलब्ध आहेत.




























































