
9 डिसेंबर रोजी हिंदुस्थान-चीन सैन्यामध्ये पुन्हा एकदा चकमक उडाली. अरुणाचल प्रदेशमधील (Arunachal Pradesh) तवांग सेक्टरमध्ये (Tawang Sector) सीमारेषेवर दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने आले. या चकमकीत हिंदुस्थानचे 20 जवान जखमी झाले असून त्यातील 6 जवान गंभीर जखमी आहेत. या 6 जवानांवर गुवाहाटी येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती अरुणाचल प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष तपीर गाओ यांनी दिली आहे.
टेलिग्राफ या दैनिकाला तपीर यांनी ही माहिती दिली आहे. या दैनिकाचे वार्ताहर जो वॉलन यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे. 9 डिसेंबर, 2022 रोजी चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरमधून हिंदुस्थानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ‘पीएलए’चा हा प्रयत्न हिंदुस्थानच्या वीर जवानांनी हाणून पाडला. यावेळी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चकमक उडाली. यात दोन्ही देशाचे काही सैनिक जखमी झाले आहेत, अशी माहिती मिळत होती.
The BJP’s President of Arunachal Pradesh, Tapir Gao, exclusively tells @Telegraph at least 20 Indian soldiers wounded by unarmed Chinese troops in hand-to-hand combat
Mr Gao says six Indian soldiers severely injured – flown to Guwahati. With @Samaanlateef.
Full report soon
— Joe Wallen (@joerwallen) December 12, 2022
मात्र, नेमके किती सैनिक जखमी झाले, त्याची पुष्टी झाली नव्हती. गाओ यांनी टेलिग्राफ दैनिकाला दिलेल्या माहितीत जखमी सैनिकांबाबत तपशील देण्यात आले आहेत, अशी माहिती जो यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये दिली आहे.



























































