
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सर्वांचे लाडके ‘नट्टूकाका’ अर्थात ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक यांचे मागच्या महिन्यात निधन झाले. मालिकेत त्यांची भूमिका महत्वाची आणि लोकप्रिय होती. ते गेल्यानंतर मालिकेत त्यांची जागा रिक्त झाली आहे. मात्र आता चर्चा आहे की, आता मालिकेच्या निर्मात्यांना नवीन नट्टू काका मिळाले आहेत.
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक ज्येष्ठ अभिनेते खुर्चीवर बसलेले दिसत आहे. त्यांचा हा फोटो पाहून हा फोटो मालिकेच्या गडा इलेक्ट्रॉनिक्सच्या आतील असल्याचे दिसत आहे. ही इंस्टाग्राम पोस्ट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिवंगत अभिनेते घनश्याम नायक एका बाजूला तर दुसऱ्याला वाजूला हे ज्येष्ठ अभिनेते दिसत आहेत. इंस्टाग्रामच्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘मग तुम्हाला काय वाटते’. अशातच या पोस्टवर कमेंट्स करत अनेक चाहत्यांनी लिहिलं आहे की, नट्टू काकांची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
View this post on Instagram
दरम्यान, घनश्याम नायक हे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत होते. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘तारक मेहता…’ या मालिकेमुळे. मालिकेत जेठालालच्या दुकानात काम करणाऱया नट्टूकाका आणि बागा या जोडीने अक्षरशः धम्माल उडवून दिली होती. घनश्याम नायक यांनी 350 हून अधिक हिंदी मालिका तसेच बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले होते.

























































