
शाळेत येताना जर टिळा लावून आलात तर तुमच्यावर अॅसिड टाकून तो टिळा पुसून काढू व शेंडी असेल तर ती कापून टाकू अशी धमकीच एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिली आहे. हरयाणातील यमुनानगर येथील डीएव्ही पब्लिक शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. या घटनेची पालकांनी काही हिंदुत्त्ववादी संघटनांकडे तक्रार केली. त्यानंतर शाळेकडून माफी मागण्यात आली आहे.
डीएव्ही शाळेतील 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत टिळा लावून येण्यास व शेंडी ठेवण्यास मनाई करण्यात आलेली होती. मात्र काही विद्यार्थी ऐकत नसल्याने एका शिक्षकाने त्यांना याबाबत थेट जाब विचारला. त्यानंतर त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांवर अॅसिड टाकायची धमकी दिली त्यामुळे विद्यार्थी घाबरले. या प्रकरणाची काही पालकांनी हिंदुत्त्ववादी संघटनांकडे तक्रार केली. त्यानंतर काही पालक माँ भारती जनजागृती फाऊंडेशन संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन शाळेत गेले. तिथे शिक्षकांना याबाबत शाळेने हा वाद न वाढवता संबंधित शिक्षकाने या प्रकरणी माफी मागितली.
दोन महिन्यापूर्वीत हरयाणातील कैंप सरकारी शाळेत देखील असाच प्रकार घडला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना टिळा लावून येण्यास बंदी घातलेली. त्यानंतर काही संघटनांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केलं होतं. त्यानंतर शाळेने माफी मागत प्रकरण शांत केलं.




























































