सुमार क्षेत्ररक्षणामुळे हरलो, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची कबुली

444

वेस्ट इंडीजने रविवारी यजमान हिंदुस्थानला टी-20 लढतीत पराभूत केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. याच विजयामुळे त्यांची हिंदुस्थान विरुद्धची पराभवाची मालिकाही खंडित झाली. हा पराभव कर्णधार विराट कोहलीच्या जिव्हारी लागला. यावेळी तो म्हणाला, हिंदुस्थानच्या क्रिकेटपटूंनी क्षेत्ररक्षणात अक्षम्य चुका केल्या. मोक्याच्या क्षणी झेल सोडले. अशाप्रकारच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे कोणतेही टार्गेट सेफ नसेल. कोणतीही धावसंख्या संघ वाचवू शकत नाही, असे स्पष्ट अन् परखड मत पुढे त्याने व्यक्त केले.

जगातील कोणत्याही मैदानात सिक्सर मारू शकतो – शिवम
मुंबईचा युवा फलंदाज शिवम दुबे याने आपल्या फलंदाजीने क्रिकेटतज्ञांपासून क्रिकेटप्रेमींपर्यंत सर्वांचीच मने जिंकली. यावर तो म्हणाला, येथील स्टेडियम मोठे होते, पण तरीही अचूक टायमिंगच्या जोरावर षटकार मारण्यात यशस्वी झालो. मात्र मी जगातील कोणत्याही मैदानात सिक्सर मारू शकतो, असा विश्वास शिवम दुबे याने व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या