
‘नागिन 6’च्या मुख्य भूमिकेत असलेली प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. त्यामध्ये ती वेगळ्या आऊटफीटमध्ये दिसत आहे. तेजस्वीने फोटोंमध्ये सिल्कचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसला कट्स दिसत असून खालून हा ड्रेस झालर टाईपमध्ये दिसत आहे. तेजस्वीचा हा ड्रेस पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत, नेमके तिने काय घातले आहे. पण तेजस्वी नेहमीप्रमाणेच या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे.





























































