
सामना प्रतिनिधी । नगर
‘ठाकरे’ चित्रपटाचा ‘फस्ट डे फस्ट शो’ नगरमधील शिवसैनिकांना मोफत पाहता येणार आहे. उद्या सकाळी आठ वाजता हा शो होणार असून असल्याची सिनेमाचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिली.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आघारित सिनेमा उद्या सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नगरमध्ये चित्रपटाचे दणक्यात स्वागत होणार असून शिवसेनेच्या वतीने पहिला शो शिवसैनिकांसाठी मोफत ठेवण्यात आलेला आहे. माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड व नगर शहर शिवसेना यांच्या सौजन्याने ‘ठाकरे’ चित्रपटाचा ‘फस्ट डे फस्ट शो’ शिवसैनिकांसाठी मोफत दाखविण्यात येणार आहे.
































































