
ठाण्यातील टेंभी नाका येथे असलेले सिनेगॉग हे ज्यूधर्मीयांचे प्रार्थनास्थळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीकडून ठाणे पोलिसांना देण्यात आली आहे. या व्यक्तीने मेल करून पोलिसांना ही धमकी दिली. हा मेल समोर आल्यानंतर नौपाडा पोलीस व बॉम्बशोधक पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहे. या प्रकारामुळे सध्या सिव्हील हॉस्पिटलजवळील आंबेडकर रोड पूर्ण बंद करण्यात आला आहे.



























































