पैसे भरूनही लग्न जमले नाही; मॅट्रिमोनी साईटविरोधात तरुण थेट कोर्टात

लग्न जुळवणाऱ्या साईट म्हणजे मॅट्रिमोनी. एका तरुणाने लग्न जुळवण्यासाठी आणि मुलगी शोधण्यासाठी मॅट्रिमोनीचे सब्सक्रिप्शन घेतले. यासाठी तरुणाने रीतसर सब्सक्रिप्शनसाठी पैसेही मोजले. परंतु तरीही याचा काहीच फायदा झाला नाही. मुलगी मिळाली नाही आणि लग्नही जमले नाही. त्यामुळे संतापलेल्या एका तरुणाने थेट मॅट्रिमोनी साईटविरोधात कोर्टात धाव घेतली.

केरळमधील एर्नाकुलम जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने केरळ मॅट्रिमोनीला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष डीबी बिनू व सदस्य व्ही. रामचंद्रन, श्रीविधिया टीएन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तरुणाची ओळख जाणीवपूर्वक उघड केली नाही. या तरुणाने 2 डिसेंबर 2018 रोजी लग्नासाठी मुलगी शोधण्यासाठी केरळ मॅट्रिमोनीमध्ये नोंदणी केली होती. यासाठी 4100 रुपये नोंदणी शुल्कसुद्धा भरले.  तरुणाने 20 जानेवार 2019 रोजी हे पैसे भरले. परंतु त्याला पैसे भरल्याची पावती मिळाली नाही. त्यामुळे केरळ मॅट्रिमोनी नववधूंच्या प्रोफाईलचा अॅक्सेस देण्यास आणि त्यांच्याशी भेट घालून देण्यात अपयशी ठरली.

आयोगाने आदेशात काय म्हटले

केरळ मॅट्रिमोनीने तक्रारदाराला 4100 हे मूळ शुल्क वार्षिक सहा टक्के व्याजदरासह परत करावे. n केरळ मॅट्रिमोनीने तक्रारदाराला भरपाई म्हणून 25 हजार रुपये द्यावे.  n केरळ मॅट्रिमोनीने तक्रारदाराला 3 हजार रुपये प्रोसिडिंग फी म्हणून द्यावे.

आयोगाने केरळ मॅट्रिमोनीला आदेश मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत दिलेल्या आदेशांचे पालन करणे गरजेचे आहे, असे म्हटले