चाकूच्या धाकाने प्रवाशाला लुटणाऱ्या तिघांना अटक, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

प्रवाशाला रिक्षातून इच्छितस्थळी सोडण्याचा बहाणा करुन चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या तिघांना स्वारगेट पोलिसांनी अटक केले. ही घटना स्वारगेट ते पर्वती परिसरात घडली होती. सद्दाम बिद्री, समीर शेख, समीर बागवान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष बंडगर (वय -20, रा. कात्रज ) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गावाहून आल्यानंतर स्वारगेट बसस्थानकावर उतरले होते. त्यावेळी रिक्षाचालक सद्दामने त्यांना इच्छितस्थळी सोडतो असे सांगत रिक्षात बसविले. त्यानंतर काही अंतरावर सद्दामने समीर शेख आणि समीर बागवानला प्रवाशी असल्याचे भासवून रिक्षात बसविले. रिक्षा पर्वती परिसरातील बोळामध्ये तिघांनी संतोषला चाकूचा धाक दाखवित रोकड, मोबाईल फोन मिळून 14 हजारांचा ऐवज चोरुन नेला होता.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली असता, प्रवाशाला लुटणारे तिघेजण स्वारगेटला येणार असल्याची कर्मचारी ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय तपास करीत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या