प्रियकराने आत्महत्या केल्याच्या भीतीने प्रेयसीने घेतली तलावात उडी, नंतर भलतेच आले समोर

sunk_drawn

कल्याणमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. प्रियकराने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या भितीने  प्रेयसीनेही तलावात उडी घेतल्याची घटना कल्याण येथे घडली आहे. पण शेजारी असलेल्या तरुणाच्या लक्षात आल्यावर त्याने तिला वाचविण्यासाठी तलावात उडी घेत तिचा जीव वाचवला. पण जेव्हा ती बाहेर आली तेव्हा समोरील दृष्य पाहून थक्कच झाली.

तरुणी आणि तिच्या प्रियकरामध्ये जोरदार भांडण झाले होते. तो तिथून निघून गेला होता. पण त्याचवेळी तिला नांदिवली तलावात एक मृतदेह दिसला. तलावात उडी घेऊन प्रियकराने आत्महत्या केल्याच्या भितीने तरुणीनेही त्या तलावात उडी घेतली. कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलावातील मृतदेह कल्याणचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून तो मृतदेह बाहेर काढला. पण अग्निशमन दल तिथे पोहोचेपर्यंत त्या तरुणीने मृतदेह पाहिला आणि आपल्या प्रियकराने आत्महत्या केल्याचा समज बाळगून तिने थेट तलावात उडी घेतली. पण तिला स्थानिक रहिवाशी शुभम शेटये याने पाहिले आणि तिचा जीव वाचविण्यासाठी त्याने तलावात उडी घेतली. पण जेव्हा ती तलावाबाहेर आली त्यावेळी तिचा प्रियकर बाहेरच होता. त्याला पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.

कल्याणच्या नांदिवली तलावात सापडलेला मृतदेह तिथल्याच एका रहिवाश्याचा असून महेश भाटीया (23) असे त्याचे नाव आहे. तो तलावावरील कठड्यावर झोपला आणि झोपेत खाली पडला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.