टीप्स : मधुमेहासाठी घरातले उपाय

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की, इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. त्यामुळे दररोजच्या जीवनशैलीत थोडासा बदल केली की, मधुमेहावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. त्यासाठी काही घरगुती उपायांची मदत होऊ शकते.

  • कारल्याचा उपयोग नैसर्गिक स्टेरॉईड म्हणून केला जातो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. कारल्याच्या रसात केरोटिन नावाचं रसायन असतं. या रसात पाणी घालून दिवसातून किमान तीन वेळा घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
  • आवळ्यामुळे शरीरातील जीवनसत्त्व ‘सी’ची कमतरता भरून काढली जाते. एक चमचा आवळ्याच्या रसात कारल्याचा रस मिसळून रोज घ्या. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
  • सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कडुलिंबाची काही पाने चावून पाण्यासोबत खा. त्याचबरोबर जांभूळ किंवा गुळवेलीची पाने वाटून खाणेही फायदेशीर ठरेल. त्यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होईल.
  • मधुमेह असणाऱयांनी मध खाऊ नये असा समज असतो. पण असे काही नाही. मधात कार्बोहायड्रेट, कॅलरी आणि अनेक प्रकारची मायक्रो न्यूट्रियंट्स असतात. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी स्थिर राहते.
  • स्वयंपाकात मेथीचा वापर करणे फायदेशीर आहे. कारण रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कमीत कमी 50 ग्रॅम मेथीचा उपयोग जरूर करा. त्यामुळे नक्कीच फायदा होतो.