
शेवगाव येथे जातीय तेढ निर्माण झाल्याबद्दल त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले, शेवगाव व्यापाऱ्यांनी सलग तीन दिवस व्यवहार बंद ठेवल्यानंतर आज त्यांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्यानंतर दुपारनंतर शेवगाव मधील व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहे व्यापाऱ्यांनी आपला बंद हा मागे घेतल्या असल्याचे जाहीर केले
संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर या घटनेमध्ये चार पोलीस जखमी झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेची माहिती घेऊन संबंधांवर कठोर कारवाई करावी असे आदेश दिले व त्यानंतर येथील शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये 200 हून अधिक जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तर आत्तापर्यंत 70 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर काहींवर विनाकारण कारवाई करण्यात आली असे सांगून एक प्रकारे पोलिसांनी दबाव तंत्राचा वापर केला असे सुद्धा बोलले जात होते, घडलेल्या घटनेमध्ये सर्वांना अटक करावी असे मागणी व्यापाऱ्यांच्या कडून करण्यात आली व त्यानंतर व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचा इशारा दिला होत सलग तीन दिवस शेवगाव येथील बाजारपेठा या बंद राहिल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शेवगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेला मूक मोर्चा रद्द करण्यात आला, सोबतच बेमुदत बंद देखील मागे घेण्यात आला. हनुमान मंदिर येथे व्यापारी नागरिक आणि प्रधासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.यावेळी व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून मूकमोर्चावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने मोर्चा रद्द करून शेवगाव बंदही मागे घेतलाय, मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.




























































