
देशात वाहनांची संख्या बेसुमार वाढल्याने वाहतूककोंडी मोठय़ा प्रमाणात होत असून पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी दिल्लीत प्रगती मैदानावर ट्रॅफिक इन्फ्राटेक एक्सपोचे 10 ऑक्टोबरपासून तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हा एक्सपो वाहतूक क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहे. सहभागी होणाऱ्यांना ट्रॅफिक क्षेत्रात भविष्यात होणारे बदल, नवनवीन संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येईल. चर्चासत्रातही सहभागी होता येईल.
या ट्रॅफिक इन्फ्राटेक एक्सपोमध्ये वाहतूक, पार्किंग आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित 25 नव्या अत्याधुनिक उत्पादनांचे लाँचिंग केले जाणार आहे. तर 150 हून अधिक एक्झीबिटर आणि 350 ब्रँड या एक्सपोत आपल्या अत्याधुनिक उत्पादनांसह सहभागी होणार आहेत. येथे हजेरी लावणाऱ्याना ट्रॅफिक, पार्किंग, रोड इन्फ्रास्ट्रक्चरशी विविध बाबी पाहता येणार आहेत. एक्सपोमध्ये वाहनांमध्ये लावण्यात येणारे अत्याधुनिक सीसीटीव्ही पॅमेरे, स्पीड डिटेक्टर्स, अल्कोहोल ब्रिथ अॅनलायझर आदी उपकरणेही पाहता येणार आहेत.























































