
जगभरातील जहाज मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणाऱया इजिप्तमधील सुएझच्या कॅनॉलमध्ये ‘ट्रफिक जाम’ झाले आहे. चीनहून मालवाहतूक करणारे एक महाकाय कंटेनर जहाज समुद्रात अडकले आहे. त्यामुळे या कॅनॉलमधील जहाज वाहतूक ठप्प झाली आहे. कोरोना काळात हे मोठे व्यापार संकट मानले जात आहे.
महाकाय कंटेनर जहाजावर पनामा देशाचा झेंडा आहे. मंगळवारी सकाळी सुएझ कॅनॉलमधून जाताना जहाजाचे नियंत्रण सुटले आणि ते कॅनॉलच्या मध्यभागी अडकले. 400 मीटर लांब आणि 59 मीटर रूंद असणारे हे जहाज आहे. जहाजाला बाहेर काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर टंग बोट्स अडकलेल्या (जहाजाला धक्का देणाऱया शक्तीशाली जहाज) तैनात करण्यात आल्या आहे. आणखी काही दिवस हे ऑपरेशन सुरू राहणार आहे. या जहाजामागे शेकडो जहाज अडकले असल्याने अभुतपूर्व कोंडी झाली आहे.



























































