Photo – त्रिशा कृष्णनचा गोल्डन-मस्टर्ड यलो साडीतील पारंपारिक लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचा नुकत्याच पार पडलेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील अत्यंत सुंदर आणि पारंपारिक ‘गोल्डन-मस्टर्ड यलो’ साडीतील लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या आऊटफिटवर तिने कानांमध्ये हिरवे मणी आणि पोलकी वर्क असलेले पारंपारिक गोल्ड झुमके परिधान केले आहेत, जे तिच्या ब्लाउजच्या रंगाला परफेक्ट मॅच होत आहेत. हातामध्ये स्टायलिश गोल्ड-पर्ल बांगड्या आणि डायमंड रिंग, तर केसांचा सुंदर अंबाडा बांधून त्यावर माळलेला पांढऱ्या मोगऱ्याचा गझरा तिच्या या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे. अतिशय नॅचरल अन् ग्लोइंग मेकअपमधील त्रिशाचा हा अंदाज अत्यंत क्लासिक, एलिगंट आणि तितकाच रिच दिसत आहे.