खड्डा चुकवताना दुचाकीस्वार ऊसाच्या ट्रकखाली सापडला, जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करणारा दुचाकीस्वार ऊसाच्या ट्रकखाली सापडुन जागीच ठार झाला आहे. श्रीरंग गंगाराम उन्हाळे (55) रा.रांजणी ता.नगर असे मृताचे नाव आहे. नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीच्या मुळा नदी पुलाजवळ आज शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

श्रीरंग उन्हाळे हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे मोटरसायकलवर जात होते.रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करत असताना मोटारसायकल घसरून श्रीरंग पाठीमागच्या बाजुने येणा-या उसाच्या ट्रकखाली सापडुन जागीच ठार झाले. यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरीकांनी राहुरी पोलिसांना या घटनेची खबर दिली. सायंकाळी शव विच्छेदना नंतर श्रीरंग यांचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.