सेप्टीक टँक दुरुस्तीसाठी उतरलेल्या दोघांचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
death

सामना ऑनलाईन । परळी

परळी शहरातील साठेनगरात सेप्टीक टँक दुरुस्ती करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण अत्यवस्थ अवस्थेत आहेत. अर्जुन भालेराव (20) आणि विशाल लांडगे (20)अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर, कार्तिक कांबळे, शिवाजी लांडगे आणि विशाल भालेराव या तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे.

परळीमधील साठे नगर येथील माणिक पोकळे यांच्या घरी बुधवारी रात्री उशीरापर्यंत सेप्टीक टँक दुरुस्तीचे काम चालू होते. गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास काम सुरू असताना बांधकाम कोसळल्याने 5 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते.