श्रवण, ओमची दमदार कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय माध्यमिक बोर्डच्या वतीने आयोजित अॅरोबिक्सच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत श्रवण सावंत (14 वर्षांखालील) आणि ओम तोडणकर (11 वर्षांखालील) यांनी कास्य पदक जिंकले. या स्पर्धेत देशभरातील 16 राज्यांतून 77 शाळांमधील 400पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. शिर्डी येथील संजीवनी आंतरराष्ट्रीय शाळेत पार पडलेल्या या स्पर्धेत आयआयटी पवईच्या पेंद्रीय शाळेत शिकत असलेल्या श्रवणने सलग दुसऱयांदा हे पदक पटकावले. ओमसुद्धा याच शाळेचा विद्यार्थी असून त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एस. वानखेडे, क्रीडा शिक्षक शिवशंकर वाले यांनी कौतुक केले.