हैदराबादमध्ये दोन रोहिग्यांना ड्रग्स आणि आधार कार्डसह अटक

31

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबाद पोलिसांनी दोन रोहिग्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ड्रग्सच्या १४०० गोळ्या हस्तगत केल्या आहेत. शहरात अशा प्रकारची ही पहिली कारवाई आहे. दोन रोहिंगे हैदराबादमध्ये ड्रग्स विकत असल्याची खबर मिळाली होती. त्यावर तपास करत बालापूर पोलिसांनी या रोहिग्यांच्या शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानुसार पोलिसांनी अबीबुस रहमान आणि मोहम्मद रहीम या दोघांना अटक केली.

या ड्रग्सला मॅड ड्रग म्हटले जात असून हे ड्रग प्रामुख्याने थायलंड आणि म्यानमारहून आणले जाते. मोहम्मद रहीम याच्याकडून आधारकाडही जप्त केले असून त्यावर उत्तर प्रदेशचा पत्ता नमूद होता. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत २ लाखाहून अधिक असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या