फेसबुक लाईव्हची नशा, सुस्साट दुचाकी बसवर धडकून दोन तरुण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कांकेर

सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ करण्याची नशा तरुणांमध्ये हल्ली वाढत आहे. सुस्साट गाड्या चालवताना, अति उंच ठिकाणी गेल्यावर किंवा ट्रेकिंग करतानाही तरुणांना लाईव्ह करण्याची हौस असते आणि याच हौसेचे नशेत रुपांतर होते व अनेक तरुण आपला जीव गमावतात. असाच एक प्रकार छत्तीसकडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये समोर आला आहे. वेगाने दुचाकी चालवत असताना फेसबुक लाईव्ह करणे दोन तरुणांच्या जिवावर बेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील बस्तर येथील मनीष कुमार आणि मुरली निषाद हे दोघे ताशी १९९ किमी प्रतितास वेगाने दुचाकी चालवत होते. मनीष कुमार दुचाकी चालवत होता तर त्याचा मित्र मुरली निषाद मागच्या सीटवर बसला होता. आपल्या मित्राची वेगाने दुचाकी चालवण्याची कामगिरी मुरली फेसबुकवर लाईव्ह करत होता. मनीषही फेसबुक लाईव्हकडे अधून-मधून लक्ष देत होता. यावेळी मित्रांकडून मिळणाऱ्या कमेंटमुळे त्यांना अधिकच चेव चढला. परंतु कांकेरजवळील चारामा भागामध्ये समोरच्या दिशेने येणाऱ्या बसकडे तरुणांचे लक्षच गेले नाही आणि बस चालकालाही काही समजायच्या आत दुचाकी समोरून बसवर जोरात धडकली.

अपघातामध्ये मनीषचा जागीच मृत्यू झाला तर मुरलीला स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दरम्यान, तरुणांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने कच्चून ब्रेक दाबल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस कांकेरवरून रायपूरकडे जात होता. यात ३८ प्रवासी होते. जखमी प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.