गोदावरी अर्बन सोसायटीच्या कार्यालयाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । नांदेड

गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी लि. नांदेड यांच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी  सायंकाळी ६ वाजता रिजेंट चेंबर्स पहिला मजला, स्टेटस हॉटेलच्या  वर नरीमन पॉईंट, मुबंई येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी राज्यातील मंत्री व अनेक आमदार यांच्यासह  संस्थापक अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, संचालक उपस्थित राहणार आहे.

गोदावरी अर्बनचा कार्यविस्तार हा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, गुजरात या पाच राज्यात आहे. अर्थक्षेत्रातील अत्यंत मानाचे समजले जाणारे आणि बँकेची पत उंचावणारे अर्थरन, प्रतिबिंब, बँको, दिपस्तंभ, पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बँकिंग क्षेत्रात सर्व सोयी सुविधा खास ग्राहकांना पुरविण्यात  ही बँक यशस्वी ठरली आहे.

सामाजिक जाणिवेतून संस्थेच्या वतीने वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करण्याचे काम करण्यात येते. रक्तदानासारखा समाजोपयोगी उपक्रम राबवला जातो. विशेषतः तरुण वर्गाचे शरीर आणि मन सुदृढ राहिले पाहिजे यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. आजही समाजात केवळ पैशाअभावी लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत. किंवा ते आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते.

या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी केले आहे.