लग्नात मामाने भाचीला उचलणे हे इस्लामविरोधी, दारुल उलूमचा नवा फतवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नेहमी आपल्या फतव्यांमुळे चर्चेत राहणार्‍या दारूल उलूम देवबंद संस्थेने नवा फतवा आणला आहे. लग्नसमारंभात मामाने भाचीला उचलणे हे गैर आणि इस्लामविरोधी असून यामुळे मामाची नियत बिघडू शकते असे नव्या फतव्यात म्हटले आहे. ही प्रथा बंद केली पाहिजे असेही दारुल उलूमने म्हटले आहे.

दारूल उलूमने म्हटले आहे की, या प्रथेमुळे दोघे किंवा दोघांपैकी एकाची कामवासना जागृत होऊ शकते. ही प्रथा बंद करून वधूने चालत किंवा आईने तिला लग्नस्थळी आणावे.

तसेच एक महिला आणि मामामधील नाते हे पवित्र असते. कुठल्याही मामाने आपल्या तरुण भाचीला उचलणे हे मुस्लिम गैर आहे. जर या प्रथेत दोघांपैकी एकाचीही कामवासना जागृत झाली तर हे नाते अपवित्र होण्याची शक्यता दारूल उलूमने व्यक्त केली आहे.

दारुल उलूमने अजून एक फतवा जारी केला आहे. या फतव्यानुसार लग्नाची तारीख पाठवण्यासाठी लाल चिठ्ठीचा वापर चूकीचा सांगितला आहे. ही प्रथा मुस्लिमेतर समाजाकडून आली आहे असा दावा संस्थेने केला आहे. लाल चिठ्ठीच्या ऐवजी साध्या कागदाची चिठ्ठी पाठवावी किंवा फोनवरून लग्नाची तारीख सांगावी असे फतव्यात म्हटले आहे. दारूल उलूमने फोटो किंवा तसबीर असलेल्या दागिन्यांवरही आक्षेप घेतला आहे. अनेक मौलवींनी या फतव्याचे स्वागत केले आहे.