वीज पडून दोन महिलांसह दोन बैलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यादरम्यान दोन महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काजल विकास माळी (वय – 23) आणि राणी संदिपान सावंत (वय – 35) अशी मृत महिलांची नावे आहेत..

दरम्यान, तालुक्यातील पारगाव जो. येथे वीज अंगावर पडून दो बैलांचाही मृत्यू झाला. युवराज नवनाथ भोराडे यांच्या मालकीची बैलजोडी झाडाला बांधून ठेवण्यात आली आली होती. यादरम्यान वीज कोसळली आणि दोन्ही बैलांचा मृत्यू झाला.