
झटपट पैशासाठी उत्तर प्रदेश येथून मुंबईत येत नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळणाऱया दोघांना क्राइम ब्रँच युनिट-9 ने अटक केली. सोनू मलिक आणि तफजील सय्यद अशी त्या दोघांची नावे आहेत. ते चोरीचे मोबाईल नागपाडा येथे फिरोज अली खानला विकत होते. त्यालादेखील पोलिसांनी अटक करून 95 मोबाईल, 2 लाख 54 हजार रुपये, मोटारसायकल जप्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी सांताक्रुझ येथे राहणाऱया एकाचा मोबाईल दोन चोरटय़ांनी लांबवून पळ काढला होता. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. त्याचा समांतर तपास युनिट-9 करत होते. प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, किरण आहेर, घोडके, स्नेहल पाटील आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये सोनू आणि तफजील हे दिसले. पोलिसांनी तपास करून त्या दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्या दोघांनी मोबाईल चोरीची कबुली दिली.
तसेच वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी करीत असताना बीडच्या ज्ञानेश्वर घोडके याचा पह्टो स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी मैदानी चाचणीदरम्यानचे चित्रीकरण तपासले. त्यामध्ये मैदानी चाचणी देणाऱया उमेदवाराच्या चेहऱयावर व्रण होते. अधिक चौकशीमध्ये मैदानी चाचणी देणारा ज्ञानेश्वर नसून विकास शेळके हा तरुण असल्याचे स्पष्ट झाले. प्रभादेवी येथील प्रवीण शिंदे याच्या जागी कली नावाच्या तरुणाने मैदानी चाचणी दिली. कोल्हापूरच्या विकास जाधव याचा झोलदेखील पह्टोमुळेच पकडला गेला. त्याने सांगलीच्या गोटय़ा पाटील या तरुणाला मैदानी चाचणी देण्यास सांगितले. तर जालना येथील उमदेवार भगवान टाकले याच्याऐवजी विशाल गुसिंगे याने परीक्षा दिली. या सर्वांविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































