उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये भीषण अपघात; ट्रकची टाटा मॅजिकला धडक, 8 ठार, 15 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये रविवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिली. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. या टाटा मॅजिकमध्ये महिला आणि पुरुषांसह एकूण 26 लोक प्रवास करत होते. हे सर्व जण रामपूर येथे एका लग्न समारंभासाठी जात होते. या अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुरादाबाद जिल्ह्यातील भोजनपूर येथे हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोरवाकू गावात राहणारे अब्बास, त्यांचा भाऊ शब्बीर आणि हाजी, त्यांची बहीण मन्सर जहाँच्या मुली आणि मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी टाटा मॅजिक गाडीने रामपूरला जात होते. टाटा मॅजिकमध्ये महिला आणि मुलांसह सुमारे 26 लोक होते. दुपारी दीडच्या सुमारास पिकअप दलतपूर-काशीराम रस्त्यावर येताच समोरून येणाऱ्या ट्रकने मॅजिकला जोरदार धडक दिली.

दोन्ही गाड्या धडकल्यानंतर रस्त्याच्या कडेला उलटल्या. अपघातानंतर लगेचच आजूबाजूचे लोक घटनास्थळी मदतीसाठी धावले. अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सर्वांना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले, त्यापैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.