
उत्तरप्रदेशात एक विचित्र घटना समोर आली आहे. अवैध संबध असल्याच्या संशयावरुन एका नवऱ्याने झोपलेल्या बायकोच्या तोंडात विद्युत शॉक देऊ हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने पोलीस स्थानकात येऊन गुन्हा कबूल केला. आरोपीच्या मुलाच्या तक्रारीवरुन पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
उत्तरप्रदेशातील बुढाना येथील रहिवासी हामिद (60) यांचा मुलगी तालीफ कुटुंबासोबत लंढौरा मध्ये बस अड्ड्याजवळ राहतो. गुरुवारी रात्री हामिद आपली पत्नी खातून (52) आणि सहा वर्षांची मुलगी शबनम सोबत एका खोलीत झोपले होते. तर कुटुंबातील अन्य सदस्य दुसऱ्या खोलीत झोपले होते. आरोप आहे की, रात्री साधारण रात्री एक वाजण्याच्या सुमारास हमीदने विजेच्या तारेचे एक टोक प्लगला लावले आणि दुसरे टोक पत्नीच्या तोंडात घातल्याचा आरोप आहे. विजेचा धक्का लागल्याने खातून यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हमीदने रात्रीच पोलीस चौकी गाठून आत्मसमर्पण केले. हमीदच्या घटनेबाबत पोलिसांनाही आश्चर्य वाटले.
हमीदने सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्यामुळे त्याने खातूनची हत्या केली. पोलिसांनी हमीदला ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हमीद यांचा मुलगा नदीम याच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. चौकीचे प्रभारी नवीन चौहान यांनी सांगितले की, हमीदला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे त्याने पत्नीची हत्या केली. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, हमीद आपल्या पत्नीला विद्युत प्रवाह लावून मारत असताना आईजवळ झोपलेल्या सहा वर्षांच्या शबनमचे डोळे उघडले. हमीदने मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन घाबरवले होते. धमकीच्या भीतीने चिमुरडी काहीच बोलली नाही. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना हत्येची माहिती तेव्हाच लागली, जेव्हा हमीदने पोलिसांकडे जाऊन आत्मसमर्पण केले.
























































