
खेड तालुक्यातील वेरळ रेल्वे स्टेशन येथील गजानन कदम यांच्या मालकीची सदनिका फोडून चोरटयांनी 3 लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील करंजाळी येथून चोरट्यांना अटक केली. चोरटे सख्खे भाऊ असून त्यांच्याकडून 45 हजाराची रोकड आणि चोरीचा माल हस्तगत केला आहे.
खेड तालुक्यातील मूळचे पुरे बुद्रुक येथील असेलेले गजानन कदम यांची खेड रेल्वे स्थानक परिसरात सदनिका आहे. कदम हे सध्या आपल्या मूळगावी म्हणजे पुरे बुद्रुक येथे वास्त्यव्यास असल्याने त्यांची सदनिका बंद होती. याचा फायदा घेत दापोली तालुक्यातील करंजाळी येथील राकेश जनार्दन सुर्वे आणि रुपेश जनार्दन सुर्वे यांनी कदम यांचे बंद घर फोडून घरातून एलसीडी टिव्ही, या अन्य इलेट्रॉनिक्स वस्तू चोरून नेल्या. चोरी उघड झाल्यावर कदम यांनी खेड पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली.
खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व अन्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ तपास करून दापोली तालुक्यातील करंजाळी येथील सुर्वे बांधून अटक केली. या दोघांनाही न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने त्यांना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान या घरफोडीत आणखी एका संशयीत आरोपीचा हात असण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा आकस्मिक मृत्यू आहे की घातपात आहे. असा संशय व्यक्त होत आहे. घरफोडी उघडकीस येऊ नये. वा संशय येऊ नये. म्हणून तर घातपात केला नसेल कशावरून अशी उलटसुलट चर्चा वेरळ रेल्वे स्टेशनच्या परिसरात चर्चिली जात आहे. या प्रकरणातील संशयिताचा मृत्यू कशामुळे झाला याचा पोलिसांनी तपास केल्यास आणखी काही हाताशी लागण्याची दाट शक्यता आहे. या घरफोडीचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे आणि त्यांचे पथक करीत आहेत.





























































