सृजनशील ग्रंथोपासक हरपला, श्री. बा. जोशी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ लेखक, अनुवादक, कोशकार श्री. बा. जोशी यांचे शनिवारी बडोदे येथे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. श्री. बा. जोशी यांनी महाराष्ट्राबाहेर मराठीचे आयुष्यभर जतन, संवर्धन केले. ग्रंथपालन क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करणारे जोशी पत्नीच्या निधनानंतर गेल्या काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत होते. त्यांच्या निधनाने सृजनशील ग्रंथोपासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

श्री. बा. जोशी यांनी कोलकात्याच्या राष्ट्रीय गंथालयात 1957 साली ग्रंथालयशास्त्रातील पदवी मिळवली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील राष्ट्रीय ग्रंथालयात नोकरी मिळाली. तिथे राष्ट्रीय भाषांतील पुस्तकांची सूची तयार करण्याचे काम सुरू झाले होते. श्री. बा. यांच्याकडे मराठी भाषेच्या पुस्तकांची सूची तयार करण्याचे काम आले.

त्यांनी अन्य भाषांमधील पुस्तके मराठीत अनुवादीत केली. ‘कपिलाकाठची कहाणी’, ‘बादशाही अंगठी’, बंकिमचंद्र चॅटर्जी’, ‘अंत नाही’ व ‘प्रलाप’ अशी या पुस्तकांची नावे आहेत. नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाचा त्यांनी बंगाली अनुवाद केला. त्यांचे ‘गंगाजळी’ चे चार खंड लोकप्रिय आहेत.