विद्यालंकार पॉलिटेक्निक ऍथलेटिक्स स्पर्धेत वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडाळा येथील विद्यालंकार पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बोईसर येथे थिम पॉलिटेक्निकच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटर इंजीनियर डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य ए-2 झोनच्या अॅथलेटिक्स वर्ष 2022-23 स्पर्धेत अतिशय सुंदर कामगिरी करत अॅथलेटिक्समधील तीन प्रकारांत यश संपादन केले.

या स्पर्धेत मुंबईमधील महाराष्ट्र राज्य ए-2 झोनच्या तब्बल 18 ते 20 पॉलिटेक्निक कॉलेजचा सहभाग होता. तरीही विद्यालंकारच्या विरेन जोगळे याने या अॅथलेटिक्स स्पर्धेत (200 मीटर धावणे) प्रथम क्रमांक तर शार्दुल खांडेकरने (100 मीटर धावणे) द्वितीय क्रमांक आणि ओमकार बलाढय़ याने गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.