कुख्यात गुंड गजा मारणे याने भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एका दहिहंडी कार्यक्रमात सत्कार केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिंधे-भाजप सरकारवर घणाघात चढवला. ‘लाडके गुंड‘ म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.
कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.
पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे, त्याच कोथरुड मधील आमदार चंद्रकांत पाटील. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात पण परत निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीला लाडके गुंड महत्वाचे आहे म्हणून सत्कार चमत्कार गुंडाकडून घेतले जात आहे.या भागातील नागरिकांना अश्या गुंडपासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना मंत्री महोदय गुंडाला ‘राजाश्रय‘ देत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
हे माज आलेलं सरकार; राजकोटवरील राड्यावरून नाना पटोले यांचा मिंधे-भाजपवर घणाघात
भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने live पाहिले. पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.
View this post on Instagram
या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करतात, धमकावतात. जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या या सरकारला आता जनतेने पुष्पगुच्छ देऊन निरोप द्यावा हीच राज्यातील जनतेला विनंती, असे आवाहन वडेट्टीवार यांनी जनतेला केले.
‘लाडके गुंड‘
कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.
पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे,… pic.twitter.com/jIM7KilKSd
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 29, 2024