राजस्थानमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, गाड्या जाळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली  

राजस्थानमध्ये विधानसभेच्या मतदानादरम्यान हिंसाचार भडकला. या हिंसाचारात हाणामारी आणि गाड्या जाळल्या गेल्या. राजस्थानच्या सीकर फतेहपूरमध्ये मतदानदरम्यान दोन गटांत संघर्ष झाला. त्यात जमावाने काही गाड्यांना आग लावली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत परस्थिती नियंत्रणात आणली. अर्ध्या तासानंतर मतदान पूर्ववत झाले.

भरतपूर विधानसभा क्षेत्रात भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार अनीता सिंह यांच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यात आली तसेच त्याच्याकडील बंदूक हिसकावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावेळी अनीता सिंहही उपस्थित होत्या.

तिसरी घटना भरतपूर भागातील असून इथे मतदाराला मारहाण करण्यात आली. उमेदवाराच्या समर्थकाने मतदाराला मारल्याची प्राथमिक माहिती आहे. समर्थकाने आपल्या उमेदवारालाच मतदान करावे या कारणाने त्याला मारहाण झाली. समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी चाकूने हल्ला केला व त्यात तीन लोक जखमी झाले. त्यांना जवळच्याच इस्पितळात दाखल करण्यात आले. तर अहोर येथीथील बूथ क्रमांक २५३ आणि २५४ बूथवर मतदारांमध्येच धक्काबुक्की झाल्याच्या घटना घडल्या आहेत.


राजस्थानमध्ये ३ वाजेपर्यंत ५९.४३ टके मतदान झाले आहे.