
सध्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर एक चिमुकलीचे नृत्य भरपूर व्हायरल होत आहे. या मुलीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे, साजेसा मेकअपदेखील केला आहे. तिचे हावभाव, अभिनय करण्याचा अंदाज इतका मजेशीर आहे की, या व्हिडीओला नेटकऱयांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. बिनधास्त पण तितकीच खट्य़ाळ असलेल्या या चिमुरडीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @the_supeR_kidz या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक ह्यूज आणि लाईक्स मिळाल्या आहेत. नेटीझन्सपैकी एकाने लिहिले आहे की, ‘आई गं, किती क्यूट डान्सर.’ तर दुसऱयाने लिहिले आहे की, ‘खूपच भारी नाचली ही चिमुकली’ तर आणखी एकाने ‘या पोरीने कमाल केली राव’ असे म्हणत तिच्या नृत्याला दाद दिली आहे.


























































