
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे लाईमलाईटमध्ये असलेले चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी फिल्मफेअर पुरस्काराबाबत त्यांनी एक ट्विट केले असून ते चर्चेत आले आहेत.
खरंतर यावेळी विवेक अग्निहोत्री यांनी पुरस्कार सोहळ्याबाबत एक टोला लगावला आहे. आज मुंबईत फिल्मफेअर अवॉर्ड नाईट आयोजित करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा सलमान खान होस्ट करणार आहे. अशावेळी विवेक अग्नीहोत्रीने या फिल्मफेअर अवॉर्ड 2023 ला बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
या प्रसिद्ध पुरस्कार सोहळ्यासाठी विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मीर फाइल्सला बेस्ट डायरेक्शन सोबत सात वेगवेगळ्या विभागात नॉमिनेट केले आहे. मात्र तरीही विवेक अग्नीहोत्री या सोहळ्यात जाऊ इच्छित नाही. त्यांनी नुकतेच यावर बोलताना एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये एक सिनेमांची यादी शेअर करत विनम्रतेने सांगितले की, त्यांना कळले आहे की, त्यांचा सिनेमा द कश्मीर फाईल्स या सिनेमाला फिल्मफेअर पुरस्काराच्या 7 वेगवेगळ्या विभागात सहभागी केले गेले आहे. पण तो अशा सिनेमाविरोधी पुरस्कारांचा भाग होऊ शकत नाही.
ANNOUNCEMENT:
FILMFARE AWARDSI learnt from media that #TheKashmirFiles is nominated in 7 categories for the 68th Filmfare Awards. But I politely refuse to be part of these unethical and anti-cinema awards. Here is why:
According to Filmfare, other than the stars, nobody has… pic.twitter.com/2qKCiZ8Llh
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 27, 2023
खरंतर फिल्मफेअरकडून करण्यात आलेले ट्विट् शेअर करत विवेक अग्नीहोत्री यांनी दिग्दर्शकांच्या चेहऱ्यांच्या जागी स्टार्सचे चेहरे लावले आहेत.या गोष्टीकडे लक्ष वेधले. की आशाप्रकारच्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत. किंबहुना, विवेकने फिल्मफेअरने केलेले ट्विट शेअर करताना दिग्दर्शकाच्या चेहऱ्यांऐवजी स्टार्सच्या चेहऱ्यांकडे लक्ष वेधले आहे. अशा गोष्टी विवेक अग्निहोत्रीला अजिबात पटत नाहीत. चित्रपट निर्मात्याने आधीच आपल्या पोस्टमध्ये विजेत्यांचे अभिनंदन केले आहे आणि म्हटले आहे की गोंधळ निर्माण करणे हा उद्देश नव्हता. ते याचा चेहरा बदलायचा होता.
























































