वॉटरपोलो परीक्षण स्पर्धा रद्द, टोकियो ऑलिम्पिक आयोजकांचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी या आठवडय़ात होणारी वॉटरपोलो परिक्षण स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. जपानच्या मीडियाने ही बातमी दिली. मात्र, स्पर्धा आयोजन समितीच्या अधिकाऱयांकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जपानपध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया बरीच किचकट आहे. त्यामुळे वॉटर पोलो परीक्षण स्पर्धेसाठीचे तांत्रिक अधिकारी जपानमध्ये पोहोचू शकले नाही.

त्यामुळे ही स्पर्धा रद्द झाल्याची बातमी समोर आली. टोकियो ऑलिम्पिकला चार महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि स्पर्धा आयोजकांना मोठा धक्का बसला आहे. 18 ते 23 एप्रिलदरम्यान टोकियोत होणारी जागतिक डायव्हिंग स्पर्धाही रद्द झाली आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक आयोजकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.